esakal | अरेच्या हे काय नवीन...निकट व दूरस्थ संपर्कातील व्यक्तींनाही कोरोनाचा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

corona akola.jpg

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट संपर्कातील अति जोखमीच्या व दूरस्थ संपर्कातील कमी जोखमीच्या व्यक्तींना सुद्धा कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे अति जोखमीच्या व्यक्तींना अलगीकरणात ठेवा व कमी जोखमीच्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले आहेत. 

अरेच्या हे काय नवीन...निकट व दूरस्थ संपर्कातील व्यक्तींनाही कोरोनाचा धोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट संपर्कातील अति जोखमीच्या व दूरस्थ संपर्कातील कमी जोखमीच्या व्यक्तींना सुद्धा कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे अति जोखमीच्या व्यक्तींना अलगीकरणात ठेवा व कमी जोखमीच्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले आहेत. 

पालकमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी (ता. 9) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विविध आढावा बैठका घेतल्या. सभेत महापालिका हद्दीत आरोग्य तपासणी मोहिमेत राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. त्याअंतर्गत आतापर्यंत 86 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. आधीच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्ती सोडल्यास 796 लोक कमी जोखमीचे व दूरस्थ संपर्कातील आहेत. अशा व्यक्तींमध्ये अन्य आजार असल्यास व ज्येष्ठ नागरिक असलेल्या लोकांची विगतवारी करुन त्यांच्यावर आरोग्य यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले.

पावसाळ्यात हवामान बदलामुळे होणारे विविध आजार लक्षात घेता आरोग्य यंत्रणांनी दक्ष रहावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सभेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह आमदार, इतर लोकप्रतिनिधी व महसूल, ग्रामविकास, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

अकोट-तेल्हारा रस्ता आठ दिवसांत पूर्ण करा!
अकोट ते तेल्हारा रस्त्याच्या कामास आतापर्यंत झालेल्या खर्चाचा विचार करता काम अपूर्ण आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत या रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. अकोट ते तेल्हारा या 27 किमीच्या रस्त्याच्या कामावर आतापर्यंत 12 कोटी रुपयांचा खर्च झाला असून अद्याप केवळ मातीकामच झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अकोट ते अकोला व शेगाव ते देवरी या रस्त्यांच्या अनुक्रमे 400 मीटर व 200 मीटर भागात रुंदीकरणाची हद्द वन विभागात येत असल्याने हद्द सोडून उर्वरित भागात काम वेगाने सुरु करावे, असेही त्यांनी निर्देशित केले. 

घरकुलांसाठी वाळू द्या!
रमाई घरकूल योजना व अन्य घरकुल योजनांद्वारे घरांची बांधकामे करण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाळुची उपलब्धता आहे किंवा नाही, यासंदर्भात गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. यावेळी जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध विभागांना देण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचा, अंगणवाड्यांच्या दुरुस्ती काम व पिक कर्जाच्या वितरणाचा सुद्धा आढावा घेण्यात आला.