Bike Accident: रिसोडमध्ये भीषण दुचाकी अपघात; १९ वर्षीय युवक जागीच ठार
Resod Bike Accident: रिसोड-मालेगाव मार्गावर गवळी फार्म हाऊसजवळ दुचाकी अपघात झाला. १९ वर्षीय पवन सुरेश खंडागळे जागीच ठार झाला, तर गौरव पाचरणे गंभीर जखमी. अपघातामुळे स्थानिक रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झाले असून या घटनेमुळे रस्ते सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
रिसोड : धूलिवंदनाच्या दिवशी रिसोड-मालेगाव मार्गावर गवळी फार्म हाऊसजवळ दुचाकी नाल्याच्या पुलावर दुभाजकामध्ये जाऊन भीषण अपघात झाला. या अपघातात १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.