अर्ध्या एकरातून लाखोचे उत्पन्न; फुलशेती व पपईमधून घसघसीत उत्पन्न

मांगवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी मारोती वाळके यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत शेवंती, तायवान पपई, झेंडू फुलांच्या अवघ्या काही गुंठे शेतीवर लागवड करून लाखोंचे उत्पन्न घेतले
papaya.jpg
papaya.jpgsakal

रिसोड (जि. वाशीम) : तालुक्यातील शेती हल्ली शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याची झाल्याने हंगामी उत्पन्नाच्या भरोशावर येथील शेतकरी सतत कर्जाच्या खाईत ओढला जात आहे. असे असतानाही मांगवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी मारोती वाळके यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत शेवंती, तायवान पपई, झेंडू फुलांच्या अवघ्या काही गुंठे शेतीवर लागवड करून लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या या यशोगाथेने, सततच्या आस्माणी संकटांना कंटाळलेल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळे करण्याची जिद्द ठेवत एक आदर्श निर्माण केला आहे.

मांगवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी मारोती वाळके यांनी मागील काही वर्षामध्ये पीक पद्धतीत बदल करीत शेती पीक घेण्याचा चंग बांधलेला आहे. हंगामी पिकांमध्ये बदल करत अवघ्या २० गुंठ्यावर शेवंती फुलांच्या रोपांची लावगड केली. शेवंती फुलांना वर्षभर मागणी असून, प्रतिकिलो सुमारे शंभर रूपये दर मिळला. त्याबरोबर अवघ्या सहा गुंठे शेतावर ताईवान पपईची २४० रोपे मागील मे महिन्यात लावगड केली.

त्यातील दोनशे पपईच्या झाडांना भरघोस फळे लगली असून, ऐन लाॅकडाउन दरम्यान शेताशेजारीच रस्त्यावर स्वतः पपई फळाची विक्री केल्याने प्रती झाडाचे १२०० रुपये उत्पन्न मिळाले असून, अद्यापही पपई झाडाला फळे लगलेली आहेत. २० गुंठे शेतावर झेंडू फुलाचे उत्पन्न घेतले असून, जवळपास दीड लाखांचे यामधून उत्पन्न मिळाले असल्याची माहिती अलपभूधारक शेतकरी मारोती वाळके यांनी दिली.

परिसरामध्ये आजही अनेक शेतकरी पारंपरिक शेतीवर अवलंबून राहात आहेत. परंतु, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका येथील पीक पद्धतीला सतत बसत आहे. पर्यायाने येथील शेतकरी हा सर्व बाजुने संकटामध्ये सापडत असल्याने शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेसह नैसर्गिक वातावरणाचा अभ्यास करीत शेती व्यवसाय करणे काळाची गरज निर्माण झाली आहे.

"मी आधी वाहनचालक होतो. परंतु, लाॅकडाउनमुळे वाहन चालत नसल्यामुळे काही तरी वेगळ्या पद्धतीची शेती करायचे ठरवले आणि शेवंती, ताईवान पपई, झेंडू अशा विविधांगी पिकाची लागवड केली. यामध्ये चांगलाच फायदा झाला आणि हाती चांगले उत्पन्न मिळाले. त्यामुळे शेती करण्याचा उत्साह वाढला. प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान अर्ध्या एकरावर तरी फूल शेती व फळबाग करावी."

- मारोती वाळके, शेतकरी, मांगवाडी, तालुका रिसोड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com