

अर्चना फाटे
मोताळा : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले तालुक्यातील रोहिणखेड हे गाव आपली ओळख जपून आहे. गावात ऐतिहासिक मशीद, मंदिर व प्राचीन काळातील अनेक ऐतिहासिक अवशेष अजूनही जिवंत आहेत. बुलडाणा शहरापासून २० कि.मी. आणि मोताळा तालुक्यापासून १२ कि.मी. अंतरावरील रोहिणखेड हे प्रसिद्ध तथा पुरातन वस्ती असणारे गाव आहे.