esakal | आरटीईची आज मुदत संपणार; आतापर्यंत १ हजार ३०३ निश्चित प्रवेश!
sakal

बोलून बातमी शोधा

RTE_education.jpg

आरटीईची आज मुदत संपणार; आतापर्यंत १ हजार ३०३ निश्चित प्रवेश!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः शिक्षण हक्क अधिनियमाअंतर्गत (आरटीई) शाळा प्रवेशासाठी काढण्यात आलेल्या पहिल्या सोडतीमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या एक हजार ८१७ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ३०३ विद्यार्थ्यांचेच गुरुवार (ता. ८) पर्यंत निश्चित प्रवेश झाले आहेत. त्यासोबतच ६२६ विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश देण्यात आले आहेत. दरम्यान, प्रवेशाची अंतिम मुदत ९ जुलै रोजी संपत असल्याने प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. (RTE expires today; 1 thousand 303 definite admissions so far!)

हेही वाचा: दर्शन घेऊन परतणाऱ्या चार युवकांवर काळाची झडप

गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. दरम्यान यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ४ हजार ७०७ ऑनलाईन अर्ज करण्यात आले. क्षमतेपेक्षा २ हजार ७४७ जास्त अर्ज आले आहेत. परंतु प्रत्यक्षात १ हजार ८१७ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया शाळा स्तरावर सुरु झाली आहे. प्रवेश प्रक्रियेला एकवेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर प्रवेशाची मुदत ९ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे शासनाच्या पुढील निर्देशाकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

संपादन - विवेक मेतकर

RTE expires today; 1 thousand 303 definite admissions so far!

loading image