Akola News : ग्रामीण भागात शेणखताचा भासतोय तुटवडा!

शेतीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर; पशुधन सांभाळणेही परवडेना
rural area fertilizer shortage traditional farming animal feeding agriculture
rural area fertilizer shortage traditional farming animal feeding agricultureSakal

विवरा : पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात पारंपरिक शेती करणाऱ्यावर भर देण्यात येते. यासाठी नैसर्गिक किंवा रासायनिक खते वापरली जातात. सध्या तालुक्यात बहुतांश ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली जात असल्याने शेतीसाठी सांभाळल्या जाणाऱ्या पशुधनाची संख्या दिवसा गणिक कमी होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेणखताचा तुटवडा भासत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.

पातूर तालुक्यातील शेतकरी शेतीचा पोत वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करतात. मात्र, अलीकडच्या काळात पशुधनाची संख्या घटत असल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे. शेतीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी शेतीसाठी गाय, म्हैस, बैल याचा वापर कमी करू लागला आहे.

तसेच घरोघरी मनुष्यबळ अभावी शेतकऱ्यांनी जनावर पाळणे कमी केले आहे. त्यातच जनावरांचे किमतीही वाढल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. चाऱ्याचे वाढते भाव व पाणी टंचाईमुळे शेतकरी पशुपालन करण्यास टाळत आहे.

त्यामुळे सध्या शेणखताचा तुटवडा जाणवत आहे. काही शेतकऱ्यांकडे साठा आहे, ते हजारो रुपयात विक्री करतायेत. मात्र, हा भाव देऊनही मुबलक प्रमाणात खत मिळण्याची खात्री नाही. हल्ली ज्या शेतकऱ्यांकडे शेणखत उपलब्ध आहे ते स्वतःच्या शेतात टाकण्यासस प्राधान्य देतात. त्याची गरज भागल्यास शेण खताची विक्री करतात.

त्यामुळे शेतकरी शेण खताच्या शोधात आहेत. त्यामुळे पातूर तालुक्यातील विवरा तेथील काही शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली आहे. त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे. दोन हजार ५०० ते तीन हजार रुपये प्रति ट्रॅक्टर ट्रॉली दराने सध्या शेणखताची विक्री सुरू आहे.

राज्यात सेंद्रिय खताबाबत जनजागृती करण्यात येत आहे. दुसरीकडे पशुधनाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शेण खताचा तुटवडा भासत आहे. काही मोजके शेतकरी शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत आदी सेंद्रिय खताचा वापर करतात.

शेण खताला सोन्याचा भाव!

रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता सुधरावी यासाठी शेतकरी शेणखताचा वापर अधिक करतात. जमिनीत सुपीकता यावी यासाठी शेतकरी आता सेंद्रिय शेती, जैविक शेतीवर भर देतात. त्यासाठी मुख्यत: शेण खताचा वापर केला जातो.

ग्रामीण भागात शण खताचे डोस देण्याकडे शेतकऱ्याचा कल असतो. शेण खतामुळे पिकाच्या मुळ्या परिपक्व होऊन विविध सूक्ष्म अन्नद्रव्य मिळत असतात. त्याचा फायदा पुढे फळ धारणेला होत असतो त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी शेणखत वापरण्यास प्राधान्य देतो. मात्र, घटत चाललेली पशुधनाची संख्या लक्षात घेता शेण खताचा सोन्याचा भाव मिळतो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com