

Success Story
sakal
मोताळा : तालुक्यातील कोथळीलगतच्या इब्राहीमपूर या छोट्याशा खेडेगावातील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील वैशाली आत्माराम पिंपळकर या युवतीने जिद्द, चिकाटी व कठोर मेहनतीच्या बळावर पोलिस दलात एन्ट्री मारली आहे. तिची महाराष्ट्र कारागृह पोलिस म्हणून निवड झाली आहे. वैशालीने संघर्षाचे अग्निदिव्य पार करून यशाचे शिखर गाठले आहे.