Cyber Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहीतेचा छळ; संग्रामपूरमध्ये धक्कादायक प्रकार

Mobile hacking case: संग्रामपूर तालुक्यात मोबाईल हॅक करून विवाहित महिलेचे खाजगी फोटो व मेसेज मिळवून ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आरोपीने बदनामी करण्याची धमकी देत पीडितेला दीर्घकाळ मानसिक छळ केला.
Cyber Crime

Cyber Crime

sakal

Updated on

संग्रामपूर : मोबाईल हॅक करत एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचे खाजगी फोटो व संदेश मिळवून तिची बदनामी करण्याची धमकी देत दीर्घकाळ मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com