

Akola News
esakal
अकोला: महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ आणि सातारा जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद २८ व २९ मार्च २०२६ रोजी साताऱ्यातील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेचे उद्घाटन शनिवार, दि. २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून खासदार ना. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.