‘तू मला आवडतेस’ असे म्हणत शेतमालकानेच केला कामावर असणाऱ्या महिलेचा...

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 20 June 2020

शेतात काम करणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहीतेचा शेतमालकाने विनयभंग केल्याची घटना जुना अंदूरा शेतशिवारात घडली.

बाळापूर (जि.अकोला) : शेतात काम करणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहीतेचा शेतमालकाने विनयभंग केल्याची घटना जुना अंदूरा शेतशिवारात घडली.

याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (ता.१९) विवाहीतेच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिस शोध घेत आहेत.

उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जुना अंदुरा शेतशिवारात असलेल्या ललीत अग्रवाल याच्या शेतात गुरुवारी (ता.१८) काम सुरू होते. शेतात अन्य महिलांसह एक २५ वर्षीय महिला देखील होती. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपी ललित अग्रवाल याने सदर महिलेचा हात पकडून ‘तू मला आवडतेस’, असे म्हणत विनयभंग केला. या प्रकरणी शुक्रवारी (ता. १९) रोजी महिलेने उरळ पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी ललित अग्रवाल (वय ६०) याच्या विरोधात विनयभंग व अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saying ‘I like you’, the farmer did the same to the woman at work ...in akola