क्रीडा संकुलाच्या धावपट्टीवर दगडाची बिछायत!

क्रीडा संकुलाच्या धावपट्टीवर दगडाची बिछायत!

वाशीम ः येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या धावपट्टीवर लाखो रूपयांचा खर्च झाला असताना ही धावपट्टी चिखलाबरोबरच दगडांची बनविली असल्याची बाब समोर आली आहे. काम पूर्ण झाल्याचे पूर्णत्व प्रमाणपत्र कंत्राटदाराला जिल्हा क्रीडा कार्यालयाने देवून कोणाचे हीत साधले हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून काम अपूर्ण असल्याची सारवासारव केली जात असून, मग पूर्णत्व प्रमाणपत्र का दिले, याची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करणे आवश्यक आहे. (Scam in the work of the sports complex at Washim)

क्रीडा संकुलाच्या धावपट्टीवर दगडाची बिछायत!
इंग्रजी शाळा एकवटल्या; शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रावरून वादळ


येथील जिल्हा क्रीडा संकुलावर खेळाडूंसाठी धावपट्टी आहे. याच धावपट्टीवर खेळाडू सराव करतात. एका तपानंतर या धावपट्टीच्या दुरूस्तीसाठी चार लाख रूपये मंजूर करण्यात आले होते. ही धावपट्टी दुरुस्त होईल ही अपेक्षा असताना धावपट्टी वाया घालविली गेली. शंभर मीटर व चारशे मीटर प्रारंभ बिंदूवर पाऊस पडल्यानंतर २४ तासानंतरही चिखल राहत असल्याने याचे सपाटीकरण कसे झाले, याचा हा आरसा आहे. चिखलाबरोबरच या धावपट्टीवर टाकलेल्या मातीतील दगडही कंत्राटदाराने थातूरमातूर दाबून टाकल्याने एखाद्या धावपटूचा यावर कपाळमोक्ष होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

क्रीडा संकुलाच्या धावपट्टीवर दगडाची बिछायत!
प्रवेशासाठी शाळांना नियमावली; शुल्क न घेता प्रवेश द्या


पूर्णत्व प्रमाणपत्र दिले कसे?
जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून धावपट्टीचे काम अपूर्ण असल्याची सारवासारव करण्यात आली. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ही बाब उघड झाली. काम अपूर्ण असेल तर, पूर्णत्व प्रमाणपत्र कोणत्या नियमाच्या आधारे कंत्राटदाराला अदा करण्यात आले, हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. राजकीय छत्रछायेत चालणारा हा सावळा गोंधळ चौकशीच्या रडावर आणणे गरजेचे आहे. मानोरा रिसोड येथील क्रीडा संकुलावरिल कामाबाबतही चौकशी होणे आवश्यक आहे.

क्रीडा संकुलाच्या धावपट्टीवर दगडाची बिछायत!
अकोल्यात कुंटणखान्यावर छापा; महिन्याभरात दुसरी कारवाई

असा होवू शकतो अपघात
वाशीम येथील क्रीडा संकुलावरील धावपट्टीवर अनेक राज्यस्तरीय स्पर्धा होतात. या धावपट्टीला क्रीडा विभागाची तशी परवानगी मिळाली आहे. मात्र, सध्या तयार केलेल्या धावपट्टीवर मोठे दगड वर येत आहेत. धावपटूंच्या बुटाला समोर लोखंडी खिळ्याची खोबण ठेवलेली असते. त्याआधारे धावताना जमिनीचा आधार मिळतो. मात्र, ही खिळ्याची पट्टी दगडावर गेली तर, ती तुटते किंवा खेळाडू घसरून पडू शकतो. ही बाबही क्रीडा अधिकाऱ्यांच्या लक्षात न येणे गंभीर बाब आहे. मुख्य म्हणजे तज्ज्ञ समितीने धावपट्टीची पाहणी न करताच अधिकाऱ्याने पूर्णत्व प्रमाणपत्र देणे संशयास्पद आहे.

वाशीम येथील क्रीडा संकुलावरील धावपट्टीचे काम सध्या अपूर्ण आहे. कंत्राटदाराचे देयक निघण्यासाठी आपण पहिल्या टप्प्यात पूर्णत्व प्रमाणपत्र दिले आहे. धावपट्टीचे काम कंत्राटदाराकडून करून घेतले जाईल.
- चंद्रकांत उप्पलवार, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशीम

Scam in the work of the sports complex at Washim

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com