

hidayat patel akola
esakal
अकोट, ता. ६ : तालुक्यातील मोहाळा येथे जुन्या वादातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजता धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिदायत पटेल यांचा अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यात तीव्र खळबळ उडाली आहे.