शिरपूर येथे जोरदार पर्जन्यवृष्टी; सकाळपासून 44 मिमी पावसाची नोंद

गजानन देशमुख
Sunday, 11 October 2020

शिरपूर जैन येथे 11 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजल्यापासून जोरदार पाऊस झाला. 11 वाजेपर्यत सुमारे 41 मीमी पावसाची नोंद झाली.  

शिरपूर (वाशीम) : शिरपूर जैन येथे 11 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजल्यापासून जोरदार पाऊस झाला. 11 वाजेपर्यत सुमारे 41 मीमी पावसाची नोंद झाली.  

शिरपूर येथील पर्जन्यमापक गजानन वाढे यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाची यावर्षी नोंद झाली आहे. 

यावर्षी एकूण 1147 मिमी एवढा पाऊस झाला आहे. पडलेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांची मात्र दानादाना उडाल्याचे चित्र आहे .अनेक शेतकऱ्यांची सोंगलेले सोयाबीन भिजले तर काहींच्या गंजीमध्ये पाणी जाऊन नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirpur received 41 mm of rainfall in three hours