
बुलडाणा : महावितरणाने तर शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. शहरी भागातील नागरिक वीज खोळंब्यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा बाबतच्या समस्या गांभीर्याने घ्या, अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे . शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसह अन्य शेतीहिताच्या मागण्यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने आज १० जून रोजी स्थानिक महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने केली.