

रिसोड : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अल्प आयुष्याच्या काळात पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल अशी तत्त्वे आणि संस्कार दिलेले आहेत. भारताने पुढील किमान एक हजार वर्षांकरिता आपला एकमेव आदर्श नेता म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिले पाहिजे. एवढ्या उंचीचा हा नेता महाराष्ट्राला लाभला याचा अभिमान वाटला पाहिजे असा सूर स्व. पुष्पादेवी पाटील कला व महाविद्यालयातील इतिहास विभागाद्वारे प्राचार्य मधुकरराव गायकवाड आणि विभागप्रमुख श्रीहरी पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित विद्यार्थ्यांच्या परिसंवादामध्ये आवळण्यात आला.