शिवसेनेचे आमदार म्हणतात, उपवास सोडा मासांहार करा, रोगप्रतिकारशक्ती वाढेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena-mla-sanjay-gaikwad-says-eat-non-veg-instead-of-fasting-it-will-boost-the-immune-system

शिवसेनेचे आमदार म्हणतात, उपवास सोडा मासांहार करा, रोगप्रतिकारशक्ती वाढेल

अकोला : बुलडाणा Buldana जिल्ह्यातील शिवसेनेचे (Shivsena) आमदार संजय गायकवाड MLA Sanjay Gaikwad यांनी ही उपवास- तपासाची वेळ नाही, कोरोना काळात देवही वाचवायला येत नाही असे केलेले वक्तव्य एका स्थानिक वृत्तपत्रात छापून येताच वारकाऱ्यांकडून यावर तीव्र आक्षेप नोंदवला जात आहे. त्यावर एका वारकऱ्याने गायकवाड यांना फोन करताच ३१ मे नंतर सर्व महाराजांनी सिंदखेडराजा Sindkhedraja येथे यावे, मग होऊन जाऊदे आमने-सामने, असे म्हटले आहे. त्यांच्या संभाषणाची ही आॅडिओ क्लिप व्हायरल होत आहे. Buldana MLA Sanjay Gaikwad Challeges Warkari over Phone

आमदार गायकवाड यांनी उपवास-तापास Fasting करू नका मांसाहार Non Veg करा आणि कोरोना Corona काळामध्ये देवाने दरवाजे बंद केले आहेत देवही तुमच्या मदतीला येणार नाही, अशा आशयाचे वक्तव्य केल्याची बातमी एका स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आली आहे. त्यामुळे वारकरी संतप्त झाले आहेत. वारकरी मंडळी हे कात्रण व्हाॅट्सअप फेसबुकवर शेअर करत आहेत.

अनेक वारकऱ्यांकडून आमदार जाधव यांना फोन करून आपल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात अकोल्यातील अच्युत महाराज बोर्डे या वारकऱ्याने आमदार गायकवाड यांना फोन केला असता, आमदार गायकवाड यांनी सर्व महाराज मंडळींनी जिजाऊ सृष्टीवर आमने सामने यावे असे म्हटले आहे. ''मला अजिबात फोनवर बोलायला वेळ नसून आता लॉक डाऊन संपल्यावर ३१ मे सर्व महाराजांनी जिजाऊ सृष्टी म्हणजे सिंदखेडराजा येथे यावे आणि आमने सामने होऊन जाऊ दे,'' असे उत्तर गायकवाड यांनी बोर्डे यांना दिले. विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी या संदर्भात संजय गायकवाड यांनी तमाम वारकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे. आमने सामने म्हणजे काय कुस्ती खेळायला गायकवाड यांनी बोलावले आहे का, असा सवाल शेटे महाराज यांनी विचारला आहे.

दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांच्यासोबत विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी फोनवर चर्चा केली. संजय गायकवाड यांचे म्हणणे आहे की मुस्लिम समाजामध्ये मांसाहाराचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून मुस्लिम समाजात कोरोना पॉझिटिव्ह संख्या कमी आहे आणि हिंदू धर्मीयांमध्ये मासाहाराचे प्रमाण कमी आहे म्हणून कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या जास्त आहे त्यांना या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला सांगितली तर ते आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगतात, असे गणेश महाराज शेटे यांनी सांगितले. Buldana MLA Sanjay Gaikwad Challeges Warkari over Phone

वारकरी संघटनांतील प्रमुख किमान वीस कीर्तनकारांना गाडीचा पास काढून देऊन त्यांच्या वाहनाचा खर्च करून बुलढाण्याला बोलवावं आम्ही तिथेही चर्चा करायला तयार आहोत, असे शेटे यांनी म्हटले आहे. कोरोना काळात वारकऱ्यांनी प्रशासनाला, सरकारला भरपूर सहकार्य केलेले आहे पण आमदारांकडून अशा प्रकारच्या बेताल वक्तव्य ची अपेक्षा नसून माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना थोडा समज देण्याची मागणीही विश्व वारकरी सेनेने केली आहे.

Web Title: Shivsena Mla Sanjay Gaikwad Says Eat Non Veg Instead Of Fasting It Will Boost The Immune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top