Housing Scheme : घरकुल दाखवा अन् पाच लाखांचे बक्षीस मिळवा!
Akola News : मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील रामेश्वर मदन नवघरे यांनी घरकुल योजनेत घर दाखवून पाच लाख रुपये बक्षीस मिळवण्याची शर्त ठेवली आहे. त्यांनी पंचायत समिती मालेगाव येथे तक्रार करून एक अनोखं आव्हान दिलं आहे.
शिरपूर जैन : घरकुल योजनेतील घरकुल दाखवा व पाच लक्ष रुपये रोख बक्षीस मिळवा असे मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील रामेश्वर मदन नवघरे या नागरिकाने पंचायत समिती मालेगाव येथे तक्रार देऊन एक प्रकारे आव्हान केले आहे.