Shri Gajanan Maharaj Prakat Din : संतनगरीत श्रीं चा आज १४७ वा प्रगटदिनोत्सव; शेकडो भजनी दिंड्या उत्सवात सहभागी

Shegaon Celebrations : शेगावमध्ये श्री गजानन महाराजांचा १४७ वा प्रकट दिन भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जात आहे. शेकडो भजनी दिंड्या आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीने मंदिर परिसर फुलला आहे, तसेच दोन दिवस मंदिर रात्रीभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहेत.
Shri Gajanan Maharaj Prakat Din
Shri Gajanan Maharaj Prakat Dinsakal
Updated on

राजेश चौधरी

शेगाव : शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज यांचा १४७ वा. प्रकट दिन उत्सव संतनगरी शेगाव मध्ये आज मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होत आहे. उत्सवानिमित्त राज्यभरातून गजानना अवलिया अवतरले जग ताराया....गण गण गणात बोते... जय गजानन श्री गजानन... असा गगनभेदी नाम घोष तसेच टाळमृदंगाच्या गजरात दंग होऊन विविध भजन गात शेकडो भजनी दिंड्या प्रकट दिनानिमित्त शेगावमध्ये दाखल झाल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com