Jigav Project : उत्कृष्ट अभियंता श्रीराम हजारे यांचा प्रेरणादायी निर्णय : पुरस्काराची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय

जिगाव प्रकल्पातून ११४ कोटींची बचत करणारे अभियंता श्रीराम हजारे; उत्कृष्ट अभियंता पुरस्काराची संपूर्ण रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अर्पण
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers

Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers

Sakal

Updated on: 

खामगाव : नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पात नावीन्यपूर्ण संकल्पना आणि प्रभावी नियोजनाच्या जोरावर शासनाचे तब्बल ११४.२६ कोटी रुपये वाचवणारे जिगाव प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता श्रीराम हजारे आणि उपविभागीय अधिकारी सुभाष निखाडे यांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने 'उत्कृष्ट अभियंता पुरस्कारा'ने गौरविण्यात आले आहे. पुणे येथील 'यशदा' केंद्रात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात जलसंपदामंत्री गिरीष महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. मात्र, केवळ शासकीय निधीची बचत करून न थांबता, पुरस्कारापोटी मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम स्वतःसाठी न स्वीकारता सध्याच्या एल निनोच्या दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा अत्यंत संवेदनशील व प्रेरणादायी निर्णय त्यांनी घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com