esakal | अकोल्यासह विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे संकेत

बोलून बातमी शोधा

Signs of heavy rains in Akola and Vidarbha Marathwada

अकोला जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाड्यात येत्या दोन ते तीन दिवस गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. गहू उत्पादकांसाठी ही चिंतेची बाब असून, वातावरणातील बदल लक्षात येताच शेतकऱ्यांची पीक काढण्याची लगबग वाढली आहे.

अकोल्यासह विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे संकेत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः अकोला जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाड्यात येत्या दोन ते तीन दिवस गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. गहू उत्पादकांसाठी ही चिंतेची बाब असून, वातावरणातील बदल लक्षात येताच शेतकऱ्यांची पीक काढण्याची लगबग वाढली आहे.

जमिनीपासून साधारण तीन कि.मी.वर सक्रिय असलेले चक्राकार वारे, तापमानात होणारी घट आणि निरंतर वाढणारी आर्द्रता यामुळे तेलंगाणा, कर्नाटक सीमा क्षेत्रात सक्रिय असलेले सिस्टिमचे विस्तारीत टोक विदर्भाच्या पश्चिम-दक्षिण सीमेपर्यंत पोहचले आहे. या बदलामुळे गुरुवारी (ता.८) अकोल्यासह विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून, अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात उद्या व विदर्भातील इतर ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस वादळी पावसाचे संकेत दिले आहेत.

नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली-परभणी-बीड (पूर्व), पुणे, नाशिक, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यात तसेच चंद्रपूर-यवतमाळ, चंद्रपूर-गडचिरोली, अकोला सीमा परिसरात सुद्धा गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता दिसून येत आहे. निरंतर ढगाळ वातावरण आणि आर्द्रता यामुळे रात्रीच्या वातावरणात ‘उमस’ तसेच किंचित तापमान वाढ होण्याची शक्यता.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

येथे वातावरण ढगाळले
गुरुवारच्या (ता.८) उपग्रह छायाचित्रानुसार मराठवाडा विभागतील नांदेड-लातूर-उस्मानाबाद, बीड-परभणी-हिंगोली, विदर्भातील वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, अमरावती (धारणी, चिखलदरा तालुका), अकोला, चंद्रपूर तर, नाशिक-नगर-पुणे जिल्ह्याच्या सीमा परिसरात तसेच सोलापूर-सांगली, उत्तर सातारा इत्यादी जिल्हा मध्ये वातावरण ढगाळलेले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)