esakal | बच्चू कडू म्हणतात सहा दिवस पाळा... कोरोना टाळा!
sakal

बोलून बातमी शोधा

bacchu kadu akola new.jpg

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे 1 ते 6 जून या कालावधीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थित आयोजित सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. सदर निर्णयाला राज्याच्या मुख्य सचिवांची अद्याप मान्यता दिली नाही, परिणामी महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी सहा दिवसांचा जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तीने पाळण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू व आमदारांनी केले आहे. यासंबंधीच्या आवाहनाचे लेखी पत्रच जारी करण्यात आले आहे. 

बच्चू कडू म्हणतात सहा दिवस पाळा... कोरोना टाळा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे 1 ते 6 जून या कालावधीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थित आयोजित सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. सदर निर्णयाला राज्याच्या मुख्य सचिवांची अद्याप मान्यता दिली नाही, परिणामी महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी सहा दिवसांचा जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तीने पाळण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू व आमदारांनी केले आहे. यासंबंधीच्या आवाहनाचे लेखी पत्रच जारी करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात गत काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव होत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महापालिकेच्या हद्दीत चहूबाजूने कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या व्यक्ती आढळून येत आहेत. आगामी काही दिवसांमध्ये पावसाळ्याला सुरुवात होत असून या ऋतुमध्ये साथीचे रोग सुद्धा डोके काढतात. अशा प्रसंगी कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिबंध करणे अवघड होईल. त्यामुळे 28 मे रोजी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत शहराच्या हितासाठी कोरोनावर प्रतिबंध म्हणून 1 ते 6 जून या कालावधीत जनता कर्फ्यूची अंमलबजावणी झाल्यास हितकारक ठरेल यावर सर्वांचे एकमत झाले होते. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन अकोला शहरातील जनतेला करण्यात आले आहे. 

बाजारपेठ बंद; वैद्यकीय सुविधा राहणार सुरू
जनात कर्फ्यूच्या दरम्यान शहरातील सर्व बाजारपेठेतील प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येतील. परंतु आजारी व्यक्तीवर उपचार व्हावे यासाठी सर्व खाजगी तसेच शासकीय रुग्णालये, औषधींची दुकाने 24 तास सुरु ठेवण्यात येतील. याव्यतिरीक्त शेतीशी संबंधित कामे व घरपोच दूध विक्री सकाळी 6 ते 9 यावेळेत सुरू राहिल. 

दोन महिने देशासाठी; सहा दिवस शहरासाठी
सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत जनता कर्फ्यूच्या प्रस्तावाला राज्याच्या मुख्य सचिवांनी अद्याप मंजुरी दिली नाही. परंतु अकोला शहरातील नागरिकांसाठी जनता कर्फ्यू आवश्‍यक असल्याने ‘दोन महिने देशासाठी, सहा दिवस शहरासाठी’ या थिमवर महापालिका हद्दीत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने, महापौर अर्चना मसने, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार अमोल मिटकरी, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरिष पिंपळे, आमदार रणधीर सावरकर व आमदार नितीन देशमुख यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे निवेदनच जारी करण्यात आले आहे. 

loading image