बुलडाणा जिल्ह्यावर पुन्हा शोककळा; २४ तासांत दुसरा सैनिक शहीद

बुलडाणा जिल्ह्यावर पुन्हा शोककळा; २४ तासांत दुसरा सैनिक शहीद

सुलतानपूर (जि. बुलडाणा) : बुलडाणा जिल्हा शोकसागरात असतानाच पुन्हा त्यात भर पडली आहे. लोणार तालुक्यातील बिबी येथील सैनिक किशोर काळूसे शहीद झाल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. चिखली येथील शहीद जवान कैलास पवार, शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील आणि आता लोणार तालुक्यातील बिबी येथील जवानाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. बुधवारी (ता. ४) दुपारी दोन वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने अहमदनगर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

शहीद जवान किशोर काळूसे हा ४ ऑगस्टला अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्पमध्ये कर्तव्य बजावत असताना दुपारी दोन वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. मृत्यूसमयी तो ३२ वर्षांचा होता. शहीद जवान किशोर काळूसे वयाच्या १९ व्या वर्षी २००९ मध्ये सैन्यात भरती झाला होता. त्याने सिलिगुडी व पंजाबमधील जालंधर येथे सेवा केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यावर पुन्हा शोककळा; २४ तासांत दुसरा सैनिक शहीद
कृषी विभागाला बांधाची ‘अ‍ॅलर्जी’; कास्तकारांत नाराजी

२०१९ मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर येथील मिलिट्री कॅममध्ये त्याची बदली झाली होता. ४ ऑगस्टला कर्तव्य बजावत असताना दुपारी दोन वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला व उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. शहीद जवान किशोर काळुसे हा नायब सुभेदार पदावर होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ व एक बहीण असा आप्तपरिवार आहे. शहीद जवान किशोर काळुसे यांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांवर, मित्र परिवारावर तसेच बिबी गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शहीद जवान कैलास काळुसे याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आज दुपारनंतर पार्थिव पोहोचल्यावर होणार आहे. याबाबत प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.
- सैफन नदाफ, तहसीलदार, लोणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com