
मूल : जंगलालगत असलेल्या आंब्यांच्या बागेतील आंबे तोडण्यासाठी गेलेल्या एकावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवार (ता. ९) मारोडा बीटाअंतर्गत बफर झोनच्या कम्पार्टमेंट क्रमांक ८९२ मध्ये घडली. मृताचे नाव जयदेव पोतलू करनकर (वय ६५) असे आहे. मृत हा आमटे फार्म येथील सोमनाथ प्रकल्पातील कार्यकर्ता होता. सोमनाथ प्रकल्पाच्या परिसरालगतच ही घटना घडल्याने प्रकल्पात खळबळ उडाली आहे.