
बार्शीटाकळी : तालुक्यात सध्या महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित अनुदानित सोयाबीन बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर ठरवून दिलेल्या कृषी सेवा केंद्रावरून बियाणे वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. या सर्व प्रक्रियेवर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे पथकाची निगराणी असल्याचे दिसून येते.