
अकोला : जून महिन्यात पावसाच्या आगमनासोबतच आलेल्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, घशातील खवखव, अंगदुखी, अशक्तपणा अशा लक्षणांनी ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या घरोघरी व्हायरल तापाचे रुग्ण आढळून येत असून, खाजगी क्लिनिकपासून ते सर्वोपचार रुग्णालयांत रुग्णांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. यामध्ये लहान मुले आणि वृद्ध नागरिक अधिक प्रमाणात प्रभावित होत आहेत.