बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा! - बच्चू कडू

बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा! - बच्चू कडू
बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा! -  बच्चू कडू
बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा! - बच्चू कडूअकोला
Updated on

अकोला ः कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये (The third wave) बालकांना संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, ही बाब लक्षात घेता बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर (Separate covid center for children) तयार करावे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खरीप हंगामात पेरणीच्या कामानिमित्त शेतीकामाची लगबग वाढेल, अशा परिस्थितीत कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यंत्रणेस दिले. Start a separate Kovid Center for Kids! - Bacchu Kadu

जिल्हाधिकारी यांच्या दालनात गुरुवारी (ता. १३) कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, माता बाल संगोपण अधिकारी डॉ. मनीष शर्मा, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. घोरपडे, डॉ. अष्टपुत्रे, डॉ. सिरसाम, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.

दुसरा डोस घेणाऱ्याला प्राधान्य द्या!

जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेबाबत आढावा घेऊन दुसरा डोस घेण्याऱ्या व्यक्तींना प्राधान्य द्यावे. तसेच लसीकरण केंद्रावर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध कराव्या. केंद्रावर अनावश्यक गर्दी होणार नाही याकरीता उपायोजना कराव्या. ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणाकरीता जनजागृती करुन लसीकरणाकरीता प्रोत्साहित करावे, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.

कोविड सेंटरची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरला भेट देवून कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोई-सुविधाची पालकमंत्री बच्चू कडू यांनी पाहणी केली. दरम्यान रुग्णाना चांगल्या दर्जाचे जेवण व रुग्णालयात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्याच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णांनाच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

संपादन - विवेक मेतकर

Start a separate Kovid Center for Kids! - Bacchu Kadu

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com