पोलिसांनो आहे तिथेच थांबा, 338 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना तुर्तास स्थगिती

भगवान वानखेडे
Monday, 27 July 2020

जिल्ह्यात अखंडीत किंवा खंडीत स्वरुपाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविली होती. यात ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ पाच वर्ष झालेला आहे, किंवा त्या कर्मचाऱ्याने बदलीसाठी विनंती केली असेल अशा पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार होत्या.

अकोला :  प्रशासकीय आणि विनंतीवरून सन 2020-21 या आर्थिक वर्षात 31 मे पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या या 31 जुलैपर्यंत त्या-त्या संवर्गातील एकुण कार्यरत पदाच्या 15 टक्‍क्‍याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 338 पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या बुधवारी करण्यात आल्या होत्या. मात्र, 25 जुलै रोजी पोलिस उपअधीक्षकांनी काढलेल्या आदेशानुसार झालेल्या बदल्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जिल्ह्यात अखंडीत किंवा खंडीत स्वरुपाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविली होती. यात ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ पाच वर्ष झालेला आहे, किंवा त्या कर्मचाऱ्याने बदलीसाठी विनंती केली असेल अशा पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार होत्या.

विशेष म्हणजे, पोलिस दलातील सर्वच पोलिस स्टेशनसह जिल्हा नियंत्रण कक्ष, सुरक्षा शाखा, यातायात विभाग, पोलिस मुख्यालय, बीडीएस, महिला तक्रार निवारण कक्ष, सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा अशा सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचा बदल्यामध्ये समावेश करण्यात आला होता.

या झालेल्या बदल्या झाल्या स्थगित -  पद संख्या
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक 24
हेड कॉन्स्टेबल 63
पोलिस नाईक 64
(संपादन - विवेक मेतकर)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stay where Akola police are, transfer of 338 police personnel postponed immediately