

Akola
esakal
अकोला: डायरिया (जुलाब) हा लहान मुले आणि बालकांमध्ये आढळणारा गंभीर आजार असून विशेषतः पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि अपुरी स्वच्छता यामुळे त्याचे प्रमाण वाढते. या आजारामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊन निर्जलीकरणाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाच वर्षांखालील बालकांमध्ये डायरियामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘स्टॉप डायरिया अभियान’ राबविण्यात येत आहे.