कोट्यावधी खर्चूनही सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल कोरोनाकाळात उपयोगशुन्य

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली सुपर स्पेशालिटी रूग्णालयाची पाहणी
कोट्यावधी खर्चूनही सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल 
कोरोनाकाळात उपयोगशुन्य

अकोला : रुग्णांना योग्य दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यात चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. त्याअंतर्गत हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता.

कोट्यावधी खर्चूनही सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल 
कोरोनाकाळात उपयोगशुन्य
बापरे! अकोल्या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; तीव्रता कमी असल्यानं जीवितहानी नाही

त्यानुसार, अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. सदर चारही इमारतींपैकी अकोल्यातील इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे;

कोट्यावधी खर्चूनही सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल 
कोरोनाकाळात उपयोगशुन्य
आमच्याकडे अस्सा आहे, विकेंड लॉकडाउन !

परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे सदर इमारत कोरोना महामारीच्या काळात पांढरा हत्ती ठरत असल्याची ओरड होत होती, परंतु आता शासनाने पदनिर्मिती मंजुरी दिल्यामुळे सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार सुरू होण्याची शक्यता असली तर आवश्यक पदांच्या तुलनेत अल्प पद मंजुर केल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त ताण वाढेल.

कोट्यावधी खर्चूनही सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल 
कोरोनाकाळात उपयोगशुन्य
अकोल्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार : बच्चू कडू

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरिल ताण वाढत असून रूग्णांसाठी खाटा मिळणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. ही बाब लक्षात घेवून कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी रूग्णालयाची इमारत उपयोग पडू शकते का, ही बाब पडताळ्यासाठी शनिवारी (ता. १७) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व इतरांनी सुपर स्पेशालिटी रूग्णालयाची पाहणी केली.

कोट्यावधी खर्चूनही सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल 
कोरोनाकाळात उपयोगशुन्य
मुख्यमंत्र्यांच्या ‘मोफत’ शिवभोजन थाळीने ठेवले अनेकांना उपाशी!


यांची होती उपस्थिती
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भविष्यात ही संख्या अधिक वाढण्याची भीती आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी बेड व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ आणि आवश्यक औषधांची गरज भासणार आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी केली. परंतु सदर रूग्णालयाचा उपयोग कोरोना विरूद्धच्या लढाईत तूर्तास होणार नसल्याचे यावेळी लक्षात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com