
लोणार : वर्षातून मोजक्या दिवशीच रंगणारा सूर्य किरणोत्सवाला अनेक भाविकांच्या उपस्थितीत आज प्रारंभ झाला. हा अद्भुत उत्सव २० मे पर्यंत चालणार आहे. लोणार येथील पुरातन दैत्य सुदन मंदिरात भगवान श्री विष्णु यांच्या चरणी साक्षात सूर्यदेव यांनी आज किरणांनी अभिषेक केला.