
चौकशीतून वरिष्ठ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा केविलवाना प्रकार झाला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध दिलेली तक्रारच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
चतारी (अकोला) : पातुर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून व्हॅक्सिनच्या सात कुप्या कंत्राटी व्हॅक्सिनेटर दीपक सोनटक्के यांनी चोरल्याची संशयास्पद तक्रार वैद्यकीय अधीक्षक स्वप्निल माहोरे यांनी चान्नी पोलिसात दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली; परंतु आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. चौकशीतून वरिष्ठ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा केविलवाना प्रकार झाला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध दिलेली तक्रारच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
हळदीवर काढणीपश्चात प्रक्रिया केल्यास उत्पन्नात वाढ
कंत्राटी व्हॅक्सिनेटर दीपक सोनटक्के यांनी चोरली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. दीपकने पोलिसांना जबाबमध्ये एक व्हॅक्सिन सस्ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना दिल्याचे सांगितले. पोलिसांच्या तपासामध्ये सुद्धा व्हॅक्सिनच्या कुप्या सापळल्या नाही. ग्रामीण रुग्णालयातून व्हॅक्सिनच्या सात कुप्या चोरी गेल्याची घटना (ता. १२) फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. त्याच दिवशी पोलिसात तक्रार देणे अपेक्षित असताना, सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ज्ञानज्योतीने उजळणार सिंदखेडचे भाग्य; जिल्ह्यातील तीन शाळांची निवड
याबाबतची माहिती जिल्ह्यात सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्याने चार दिवसानंतर (ता. १६) फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. त्या तक्रारीमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर दीपक सोनटक्के यांच्यावर संशय दाखविण्यात आला होता. संशयावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अखेर दीपक सोनटक्के याची (ता.३) मार्च रोजी जामिनावर सुटका झाली आहे. माझ्या मुलाला फसवले, सखोल चौकशी करण्यासाठी दीपकच्या वडिलांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. परंतु सदर निवेदनाची दखल घेण्यात आली नाही.
संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची चुप्प
व्हॅक्सिन चोरी प्रकरणाबाबत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी वारंवार विचारणा केली असता, त्यावर बोलायला कोणीही तयार नसून, सर्वांनी चुप्पी साधली आहे.
लसच्या कार्यक्रमामुळे परिचारिका व डॉ. कंटाळले होते
चतारी ग्रामीण रुग्णालयात (ता.५) फेब्रुवारी पासून शासकीय कर्मचाऱ्यांना लस देण्याचा कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. परंतु सदर कार्यक्रमामुळे तेथील परिचारिका डॉ. कंटाळले होते. कार्यक्रम पातूरला हलवण्याबाबत दिपकला सांगत होते. याबाबतची माहिती दिपकने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली होती. याच कारणावरून षड्यंत्र रचून व्हॅक्सिन लंपास तर केली गेली नाहीना अशी चर्चा परिसरात आहे.
२५ दिवस उलटूनही व्हक्सिन सापडल्या नाही
व्हॅक्सिन चोरी गेल्याच्या घटनेला २५ दिवसांचा कालावधी उलटला; मात्र अद्यापही व्हॅक्सिन सापडल्या नाही. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करणेएवजी थंडबस्त्यात टाकण्यात आल्याचे दिसून येते, यावरून मोठ्यांना वाचवण्यासाठी छोट्याचा बळी घेतला जात असल्याचे बोलल्या जात आहे.