esakal | मैं कोरोना हूं, रास्ते मैं रहता हूं, हवा मैं खेलता हूं
sakal

बोलून बातमी शोधा

Tai Jadhav, a woman sarpanch of Gawadhala group gram panchayat in Mehkar city carried out the campaign.jpg

मेहकर शहरात कोरोनाचा प्रकोप चांगलाच वाढत आहे. शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही परिस्थिती चिंताजनक होत आहे.

मैं कोरोना हूं, रास्ते मैं रहता हूं, हवा मैं खेलता हूं

sakal_logo
By
संतोष अवसरमोल

मेहकर (बुलडाणा) : मेहकर शहरात गंवढाळा गट ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच ताई जाधव यांनी अफरातून शक्कल लढवत, आपल्या पतीला अस्वलाचे बुजगावणे करुन त्यावर मैं कोरोना हूं, रास्ते मैं रहता हूं, हवा मैं खेलता हूं, मास्क नही लगाया तो, अंदर घुसता हूं, असा संदेश देत मेहकर शहरामधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, महसूल उपविभागीय कार्यालय या गर्दीच्या ठिकाणी हे अभियान राबवण्यात आले. 

राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राज्यभर राबविण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत, ग्रामीण भागातील महिला सरपंच ताई जाधव यांनी एक अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मेहकर शहरात कोरोनाचा प्रकोप चांगलाच वाढत आहे. शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही परिस्थिती चिंताजनक होत आहे.

शहरामधील बाधितांच्या संख्येने आकडा गाठला आहे. त्यामुळे महिला सरपंच ताई जाधव यांनी आपले गांव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत गाव कोरोना मुक्त ठेवले आहे. त्यामुळेच शहरातील वाढता प्रार्दुर्भाव पाहता मेहकर शहरात मुख्य रस्त्यावर 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या पतीला अस्वलाचे बुजगावणे बनवून एक अनोखी शक्कल लढवत जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी उपविभागीय अधिकारी गणेशजी राठोड, ठाणेदार आत्माराम प्रधान, सहायक गटविकास अधिकारी गजानन पाटोळे यांनी या अभियान रॅलीमध्ये येऊन सदिच्छा भेट दिली. गजानन जाधव, पंढरी धोंडगे, शिवप्रसाद खरात, एकनाथ जाधव, संदिप जाधव, मंगेश वानखेडे, भुषण सरदार, मंगेश जाधव, सविता सरदार, कल्पना जाधव, सुरज अवसरमोल, योगेश पवार, अजय जाधव, राहुल ढोके, आषिश गवई, आदि या अभियान रॅलीत सहभागी होते.

संपादन - सुस्मिता वडतिले