मानोरा - तालुक्यात सद्यःस्थितीत गावठी दारूचा महापूर वाहत असून हजारो लीटर दारू गावात तयार होत असल्याने गावातील तरुण वर्ग यामुळे व्यसनाधीन होऊन तंटे उद्भवत आहेत. यामुळे गावातील तंट्यांचा गावातच निपटारा करण्याच्या उदात्त हेतूने स्थापन करण्यात आलेल्या तंटामुक्त गाव मोहीम केवळ आता गावाच्या सुरुवातीलाच असलेल्या नाम फलकापूरती असल्याचे चित्र तालुक्यातील बऱ्याच गावात पहावयास मिळत आहे.