शिक्षकांवर ही काय वेळ आली, नोकरी टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांचा शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

teacher

शिक्षकांवर ही काय वेळ आली, नोकरी टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांचा शोध?

बाळापूर - तालुक्यात अनेक ठिकाणच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक वर्गांची भटकंती सुरू असून, आपल्या तुकड्या वाचविण्याच्या नादात पालकांना प्रलोभने दिल्या जात आहेत. काही ठिकाणी परस्पर टीसीच काढून नेली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे, तर नोकरी टिकवायची असेल, तर विद्यार्थी शोधा असा अलिखित फतवा काही शिक्षण संस्था चालकांनी काढल्याने शिक्षक भर उन्हात विद्यार्थ्यांसाठी गावागावांत भटकंती करीत असल्याचे दिसून येत आहेत. तालुक्यात गत १५ ते २० वर्षांत खासगी शाळांची संख्या वाढली आहे. याला नवीन शिक्षण धोरण जबाबदार असून, बहुतांश मोठ्या गावांमध्ये अनेकांनी शाळा सुरू केल्या. यामुळे विद्यार्थी मिळणे आता अत्यंत कठीण झाले. विद्यार्थी शोधता-शोधता शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहेत.

गत वर्षभरापासून कोविडचे संक्रमण असल्याने शिक्षण ऑनलाइन झाले, असे असले तरी विद्यार्थी संख्या वाढविणे हे शिक्षकांचे कर्तव्य असल्याने त्यांची धावपळ आतापासूनच सुरू झाली आहे. विद्यार्थी आपल्याच शाळेत शिकावा त्यासाठी ड्रेस, पुस्तक, नोटबुक आणि प्रसंगी पैशाचेही आमिष दाखविल्या जात आहेत. एवढ्यावरच न थांबता दहावी, बारावीचे परीक्षा केंद्र असणारे काही मुख्याध्यापक व शिक्षक पालकांना, विद्यार्थ्यांना आमच्या शाळेत न पाठविल्यास परीक्षेत तुमच्या पाल्यांना रस्ट्रीकेट करू अशाही धमक्या देताना आढळून आलेत. साम, दाम, दंड, भेद या तंत्राचा वापर होताना दिसून येत आहे.

विद्यार्थांचा तुटवडा

खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नोकरी करणारे शिक्षक पालकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांना आपल्याकडे ओढून घेत आहेत, मात्र शाळांच्या तुलनेत विद्यार्थ्यांचा तुटवडा जाणवत आहे. पाचवी आणि आठवीच्या तुकडीसाठी आवश्यक असलेले किमान विद्यार्थी कसे मिळविता येतील? याच खटाटोपामध्ये प्रत्येक शाळांचे शिक्षक तालुक्यात दिसत आहेत.

विविध प्रलोभने देवून टिसी काढून घेण्याचे प्रकार होत असतील, तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे याकडे निश्चितच लक्ष दिले जाईल व अशा प्रकाराणा आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न राहील.

- व्हि.बी. काळे, गट शिक्षणाधिकारी, बाळापूर.

Web Title: Teacher In Search Of Students For Save Job

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top