जिल्ह्याच्या सीमेवर शिक्षक करतात वाहनांची तपासणी

संतोष अवसरमोल
Tuesday, 8 September 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेहकर तालुक्यामधील डोणगाव ते अकोला रस्‍त्यावर राजगडमध्ये तपासणी नाका सुरू करण्यात आला आहे. येथे चार महिन्यांपासून शिक्षक प्रत्येक वाहनाची तपासणी करीत आहेत.

घाटबोरी (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेहकर तालुक्यामधील डोणगाव ते अकोला रस्‍त्यावर राजगडमध्ये तपासणी नाका सुरू करण्यात आला आहे. येथे चार महिन्यांपासून शिक्षक प्रत्येक वाहनाची तपासणी करीत आहेत.

कोरोनाबाधित जिल्ह्यातून येत असलेली व्यक्ती, सर्दी, खोकला, ताप अथवा अन्य काही आजार असलेल्या व्यक्ती, होम क्वारांटाइन शिक्का असलेली व्यक्ती यांची विचारपूस करून त्यांची संपूर्ण माहिती नोंदवण्याचे काम शिक्षकांवर सोपवण्यात आलले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आरोग्य विभागाकडून मोठ्या संख्येने शिक्षकांना कोविडसाठी कामावर बोलावण्यात आले होते. यामध्ये सर्वच शिक्षकांचा समावेश आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या आणि घरापासून दूर असलेले कामाचे ठिकाण यामुळे प्रवास, कोरोना प्रादुर्भाव आणि कुटुंब हे त्रिकुट सांभाळणे अवघड होत असल्याचा प्रतिक्रिया शिक्षक वर्गाकडून येत आहेत.

शिक्षकांना लवकर या कामातून मुक्त करा, अन्यथा कोरोना विषाणूने आमचा जीव गेल्याखेरिज राहणार नाही, अशी विनवणी तालुक्यातील काही शिक्षक वर्गाकडून होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers inspect vehicles at Akola News district boundary