esakal | कोरोनात हरपला आठवडी बाजार!
sakal

बोलून बातमी शोधा

telharas bajar

गेल्या चार महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आता शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील मार्केट व बाजार पेठ सुरू होत आहेत.

कोरोनात हरपला आठवडी बाजार!

sakal_logo
By
पंकज भारसाकळे

तेल्हारा (अकोला) : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने तीन महिने टाळेबंदी लागू केली. त्यानंतर आता टप्प्या-टप्याने टाळेबंदीचे शिथिलीकरण करण्यात येत आहे. परंतु आठवडी बाजार सुरू करण्यासंदर्भात अद्याप निर्णय न झाल्याने या बाजारात वस्तुंची विक्री करुन पोटाची भूक भागवणाऱ्यांचे मात्र हाल होत आहेत. तेल्हाऱ्यातील आठवडी बाजार सुद्धा कोरोनाच्या काळात हरपल्यामुळे सामान्य नागरिकांसह, मजुर, शेतकरी, व्यापारी व दुकानदारांच्या अडचणीत वाढ होत आहे.

हे ही वाचा : वाशीमकरांचा रस्त्यांचा वनवास संपला; मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ६० कोटी मंजूर


सर्व काही सुरळीत सुरू होते, परंतु अचानक कोरोना आला आणि सर्व काही बंद होऊन लॉकडाऊन झाले. गेल्या मार्च महिन्यापासून देशात कोरोनाने अनेक बळी गेले व अनेक बरेही झाले. गेल्या चार महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आता शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील मार्केट व बाजार पेठ सुरू होत आहेत. अशातच नागरिक सुद्धा आपली सुरक्षा ठेवत कोरोनाचे नियम पाळत आहेत. कारण 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या शासनाच्या उपक्रमात आरोग्य अधिकारी घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा : मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाणे ठरले जिल्ह्यात अव्वल; मूल्यांकन पद्धतीत केली उत्कृष्ट कामगिरी

अशातच शेतकरी सर्वसामान्यांना अतिशय महत्वाचा असणारा आठवड्यातील दिवस म्हणजे रविवार हा आहे. याचं दिवसाला तेल्हारा शहरात अन्यन्य महत्व आहे. कारण कित्येक वर्षांपासून इथे आठवडी बाजार भरतो आहे. तरी या बाजारात विविध प्रकारच्या वस्तू मिळतात. शेतकरी तथा छोटे, मोठे लघुउद्योग करणारे यांना व्यवसायिक बाजारपेठ उपलब्ध होत असते. याच बाजारात विविध प्रकाराच्या वस्तूची रेलचेल होत असते. त्यामुळे नगर परिषदेने सध्या सुरू असलेल्या तात्पुरत्या स्वरुपात शनिवार आठवडी बाजार बंद करून पूर्वरत रविवार बाजार सुरू करावा जेणेकरून अनेकांना रोजगार उपलब्ध होईल व आपले हक्काची बाजार पेठ उपलब्ध होईल.

तेल्हारा रविवारीय आठवडी बाजार पूर्वरत सुरळीत सुरू करण्याबाबत लवकरच नगर परिषद निर्णय घेऊन आदेश जारी करेल.
- जयश्री गोविंद पुंडकर, नगराध्यक्षा, नगर परिषद, तेल्हारा

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाजार पेठ सुरू करण्याबाबत निर्देश मिळत आहेत. सध्या तात्पुरत्या स्वरूपात शनिवारीय बाजर सुरू आहे. तरी लवकरच रविवारीय आठवडी बाजार सुरू करण्यात येईल.
- मनोहर अकोटकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, तेल्हारा

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे छोटे व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी शासनाने नियमित तेल्हारा रविवारी आठवडी बाजार सुरू करून व्यवसाईक संधीसाठी बाजार पेठ उपलब्ध करून द्यावी.
- राजू उजवणे, भाजीपाला विक्रेता

संपादन - सुस्मिता वडतिले