अकोला-अकोट ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या चाचणीला सुरुवात

मनोज भिवगडे 
Friday, 24 July 2020

अकोला ते अकोटपर्यंतचा ४५ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे मीटरगेजवरून ब्रॉडगेजमध्ये परिवर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. अकोट ते खंडवा मार्गाचे गेज परिवर्तन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुद्द्यावरून रखडलेले असताना आता दक्षिण-मध्य रेल्वेने अकोला ते अकोटपर्यंतचा मार्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

अकोला : अकोला ते अकोट दरम्यानच्या ब्रॉडग्रेज मार्गाची चाचणी २३ जुलै घेण्यात आली. २४ जुलै या मार्गावर चाचणी घेण्यात येणार आहे.

अकोला ते अकोटपर्यंतचा ४५ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे मीटरगेजवरून ब्रॉडगेजमध्ये परिवर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. अकोट ते खंडवा मार्गाचे गेज परिवर्तन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुद्द्यावरून रखडलेले असताना आता दक्षिण-मध्य रेल्वेने अकोला ते अकोटपर्यंतचा मार्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोला स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम पूर्ण करण्यात आले. आता अकोला ते अकोटपर्यंतच्या मार्गाची विशेष गाडी चालवून चाचणी घेण्यात आली. आज सकाळी ९ वाजता अकोला रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक पाचवरून १५ डबे असलेली रेल्वे रवाना झाली.

एकूण ९ ट्रॉलीपैकी चार ट्रॉली रेल्वेनंतर रवाना झाल्यात. तत्पूर्वी, फलाट क्रमांक सहावर पूजा करण्यात आली. अकोला ते गांधी स्मारक, गांधी स्मारक ते पाटसूल, पाटसूल ते अकोट व परत अकोलापर्यंत अशा टप्प्यांमध्ये ही चाचणी घेण्यात आली. उद्याा, २४ जुलैला वेगाने गाडी नेऊन चाचणी करण्यात येणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Testing of Akola-Akot broad gauge railway begins