esakal | शेगाव- अकोला मार्गावरील ब्रिटिश कालीन पूल कोसळला
sakal

बोलून बातमी शोधा

शेगाव- अकोला मार्गावरील ब्रिटिश कालीन पूल कोसळला

शेगाव- अकोला मार्गावरील ब्रिटिश कालीन पूल कोसळला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : शेगाव- अकोला मार्गावरील मनकर्णा नदीवरील शंभर वर्षे जुना असलेला पुल आज मालवाहू वाहनाच्या भाराने कोसळला. त्यामुळे वाहनाचा मागील भाग पुलाच्या खड्ड्यात रुतून बसला होता. आज शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने प्रशासनासह नागरिकांची तारांबळ उडाली. नव्या पुलाच्या कामासाठी कंत्राटदाराने या पुलाचा काही भाग करुन ठेवला होता. या घटनेमुळे शेगाव मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. (The British carpet bridge on the Shegaon-Akola road collapsed)


शेगाव - अकोला मार्गावरील लोहारा गावा जवळ मनकर्णा नदीवर ब्रिटिश कालीन पुल आहे. याच नदीवर पुढे कवठा बॅरेजमुळे पाणी अडविण्यात आल्याने पावसाळ्यात या पुलावरून दहा ते बारा फुटांवर पाणी असते. त्यामुळे या नदीवर पुलाची उंची वाढविण्याची मागणी नागरीकांनी केल्याने यांनी येथे नव्याने पुल बांधण्यात येत आहे. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास एमएच २७ बीएक्स ३२३ या क्रमांकाचे मालवाहू वाहन शेगावकडे जात होते. सदर वाहन पुलावर पोहोचताच पुलाचा भाग कोसळला. त्यामुळे वाहन खड्ड्यात अडकले. दरम्यान, पूल पडल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची गर्दी वाढली.

घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य राबविले. दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडीतही मोठी भर पडली. शुक्रवारी उशिरापर्यंत पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरूच होते. लोहारा नदीवर शंभर वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला. हा ब्रिटिशकालीन पूल अनेक महापुरांचा साक्षीदार ठरला आहे. कमी उंचीचा हा पूल महापुरात पाण्याखाली जात असल्याने या पुलालगत नव्याने उंच पूल उभारण्याातयेत असून त्यासाठी हा पुल कंत्राटदाराने कोरला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मोठी दुर्घटना टळली
सदर मालवाहू वाहन कोंबड्यांची ने आण करते. मात्र आज कोंबड्या ऐंवजी पाच जण या वाहनातून प्रवास करत होते. पुलावर सदर पोहचताच पुल कोसळला. आणि वाहन खचलेल्या भगदाडात जावून अडकले. या घटनेमुळे पाचही जणांनी एकच आरडाओरडा केला. गावकऱ्यांच्या मदतीने त्या पाच जणांना वाचविण्यात आले. नदीला पाणी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

धोकादायक पुलावरील वाहतूक बंद
अपघास कारणीभूत ठरत असलेल्या धोकादायक पुलाच
का बाजूला नव्याने पुल उभारण्याचे काम आठ महीन्यापासून सुरू आहे. त्यामुळे कामास अडथळा ठरू नये म्हणून जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. जुन्या पुलावरील वाहतूक आजच्या घटनेमुळे पुर्णपणे बंद करून ती इतरत्र मार्गावरून वळवण्यात आली आहे. अकोट, तेल्हारा, अकोला येथून शेगावला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे प्रवाशांना खुप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

The British carpet bridge on the Shegaon-Akola road collapsed

loading image
go to top