esakal | बिल्डर पिता-पुत्राला मागितली पाच लाखची खंडणी

बोलून बातमी शोधा

बिल्डर पिता-पुत्राला मागितली पाच लाखची खंडणी
बिल्डर पिता-पुत्राला मागितली पाच लाखची खंडणी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हा परिषद नगर खडकी येथील रहिवासी बिल्डर पिता- पुत्राला पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरून खदान पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिक फिर्यादी सागर कैलास प्राणजाळे यांची कौलखेड येथे एक नवीन साईट सूरू आहे. ता.२३ एप्रिल रोजी घरी जात असतांना दुपारी १२.३० वाजताचे त्यांना फोनवर खंडणीची मागणी करण्यात आली. न देण्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा फोन ट्रुकॉलरवर डॉ. वाहिद नावाने असल्याचे दाखवित होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव संतोष यादव सांगितले.

नंतर त्याचा मोबाईल क्रमांक हा ब्लाँक लिस्टवर टाकला. तरीही त्यावर त्याने दोन कॉल केले. त्यांनी याबाबतची माहिती वडिलाना दिली. तेव्हा त्यांनीसुद्धा त्याच क्रमांकावरून फोन आल्याचे त्यांनी सांगितले. फोन न उचल्याने समोरील व्यक्ती खडकी येथे घरी आला वर त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि मारहाण केली.

यावेळी वडिलाचे मित्र गौतम चौरपगार धावत आले व त्यांनी सुटका केली. आरोपीने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व जिवे मारण्याची धमकी देवून पाच लाख रुपये मागतिल्याचे तक्रारीत नमुद आहे.याप्रकरणी खदान पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संपादन - विवेक मेतकर