esakal | कोरोनाचा कहर; नवे ७५४ रुग्ण आढळले

बोलून बातमी शोधा

नकोसा उच्चांक; १७ जणांचा बळी!
नकोसा उच्चांक; १७ जणांचा बळी!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना संसर्गामुळे बुधवारी (ता. २१) उच्चांकी १७ जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच ७५४ नवे रूग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या ५९२ झाली आहे. त्यासोबच ५५९९ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

कोरोना संसर्ग तपासणीचे बुधवारी (ता. २१) जिल्ह्यात २ हजार ३०१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ७२८ अहवाल निगेटिव्ह तर ५७३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबतच रॅपिडच्या चाचण्यात १८१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बुधवारी जिल्ह्यात नव्या ७५४ रुग्णांची भर पडली. त्यासोबतच बुधवारी रुग्णालयातून १३१ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

-----------

महापालिका क्षेत्रात सर्वाधित रूग्ण

महापालिका क्षेत्रात बुधवारी सर्वाधिक ३१६ रुग्ण आढळले. त्यासोबतच मूर्तिजापूरमध्ये चार, अकोट-९३, बाळापूर - ४५, तेल्हारा-६, बार्शीटाकळी-१८, पातूर-५७, अकोला ग्रामीणमध्ये ३४ रुग्ण आढळले.

----------------

असे आहेत मृतक

- पहिला मृत्यू वाडेगाव येथील २८ वर्षीय महिलेचा झाला. या रुग्णास १३ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.

- दुसरा मृत्यू हाजी नगर येथील ५४ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १४ रोजी दाखल करण्यात आले होते.

- तिसरा मृत्यू राहुल नगर येथील ३२ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १७ रोजी दाखल करण्यात आले होते.

- चौथा मृत्यू मालेगाव ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १८ रोजी दाखल करण्यात आले होते.

- पाचवा मृत्यू शिवार येथील ५२ वर्षीय महिलेचा झाला. या महिलेस १८ रोजी दाखल करण्यात आले होते.

- सहा मृत्यू शिवणी येथील ७१ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १९ रोजी दाखल करण्यात आले होते.

- सातवा मृत्यू सिसामासा येथील ५० वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १४ रोजी दाखल करण्यात आले होते.

- आठवा मृत्यू शेकापुर ता. पातूर येथील ७२ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १९ रोजी दाखल करण्यात आले होते.

- नऊवा मृत्यू गड्डम प्लॉट येथील ७५ वर्षीय महिलेचा झाला. या रुग्णास १३ रोजी दाखल करण्यात आले होते.

- दहावा मृत्यू दहीहांडा ता. अकोट येथील ७८ वर्षीय पुरुषाचा जाला. या रुग्णास १८ रोजी दाखल करण्यात आले होते.

- अकरावा मृत्यू व्हिएचबी कॉलनी येथील ४२ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १८ रोजी दाखल करण्यात आले होते.

- बारावा मृत्यू वानखडे नगर येथील ३१ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १५ रोजी दाखल करण्यात आले होते.

- तेरावा मृत्यू वस्तापूर ता. अकोट येथील ३२ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १५ रोजी दाखल करण्यात आले होते.

- चौदावा मृत्यू मूर्तिजापूर येथील ५२ वर्षीय महिलेचा झाला. या रुग्णास २० रोजी दाखल करण्यात आले होते.

- पंधरावा मृत्यू वृंदावन नगर येथील ५४ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १८ रोजी दाखल करण्यात आले होते.

- सोळावा मृत्यू खासगी रुग्णालयात आळसी प्लॉट येथील ६० वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १४ रोजी दाखल करण्यात आले होते.

सतरावा मृत्यू पातूर येथील ४२ वर्षीय पुरुषाचा खासगी रूग्‍णालयात झाला. या रुग्णास १७ रोजी दाखल करण्यात आले होते.

---------------------

कोरोनाची सद्यस्थिती

- एकूण पॉझिटिव्ह - ३५४३७

- मयत - ५९२

- डिस्चार्ज - २९२४६

- ॲक्टिव्ह रूग्ण - ५५९९

संपादन - विवेक मेतकर

अधिक बातम्यांसाठी क्लिक करा