esakal | दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी; कोमेजणाऱ्या बिजांकुरावर पुनर्वसूची कृपा
sakal

बोलून बातमी शोधा

दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी; कोमेजणाऱ्या बिजांकुरावर पुनर्वसूची कृपा

दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी; कोमेजणाऱ्या बिजांकुरावर पुनर्वसूची कृपा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : पावसाने दमदार सुरुवात केल्याने बाळापूर तालुक्‍यातील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर खोळंबलेल्या पेरण्यांना आता सुरुवात होणार असून शेती कामाला वेग आला आहे. (The presence of rain after a long wait)


मृग नक्षत्राच्या सुरूवातीच्या टप्प्यात पडलेल्या पावसावर तालुक्यातील काही ठिकाणी पेरणी झाली आहे. त्यानंतर आर्द्रा नक्षत्र संपूर्ण कोरडे गेल्याने उगवलेले अंकूर कोमेजली. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्‍यात आली होती. मात्र आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली असून पिकांना जीवदान मिळाले आहे.या वर्षी मान्सूनपूर्व पाऊस वेळेत झाल्याने शेतकऱ्यांनी विस टक्के लगबगीने पेरणी आटोपून घेतली. मात्र पिक उगवून आल्यानंतर पावसाने दडी मारली. उन्हाची तीव्रताही हळूहळू वाढू लागली. उन्हाळ्यासारखे ऊन पडू लागल्याने पिके करपण्याच्या अवस्थेत पोहचली. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला होता. तर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशी पिकावर नांगर फिरवला आहे. तर काही ठिकाणी दुबारपेरणीचे संकट ओढवले आहे. मात्र आज बरसलेल्या पावसामुळे काही प्रमाणात पिकांना जीवदान मिळाले आहे.
तब्बल एका महिन्याच्या दिर्घ विश्रांती नंतर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदात आहे.


सोयाबीनचा पेरा वाढणार ; मूग, उडीदाचा कालावधी उलटला
तालुक्यात मृगाच्या पहील्या सरींवर विस टक्के पेरणी झाली होती. यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे. दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने
मूग व उडीद यासारख्या नगदी पिकांच्या पेरणीचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

संपादन - विवेक मेतकर

The presence of rain after a long wait

loading image