esakal | कृषी सेवा केंद्रांच्या वेळा बदलल्या
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी सेवा केंद्रांच्या वेळा बदलल्या

कृषी सेवा केंद्रांच्या वेळा बदलल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता व संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता ता.१३ मेचे सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाउन कालावधी वाढविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर निर्गमित केले. त्यानंतर्गत आता कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत सुरू राहणार आहेत. याशिवाय इतर आदेश कायम आहेत.

कडक निर्बंध काळात जिल्‍ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्‍ये मद्यविक्री संदर्भाने निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आदेशानुसार अंशतः बदल आला आते. त्यानुसार मद्य विक्री नमूना एफएल-२, एफएल/बीआर-२, फॉर्म ई, फॉर्म ई-२ व एफएलडब्लू-२ या अनुज्ञप्‍तीतून घरपोच या प्रकाराने मद्य विक्री करता येईल. नमूना सीएल-३ अनुज्ञप्‍तीतून फक्‍त सीलबंद बाटलीतून घरपोच मद्यविक्री करता येईल.

त्यासाठी सकाळी ७ ते रात्री ८ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. कोणत्‍याही परिस्थितीत मद्य विक्रीची दुकाने उघडून टेक अवे किंवा पार्सल पध्‍दतीने दुकानातून ग्राहकास विक्री करता येणार नाही. ग्राहकास मद्य विक्रीच्‍या दुकानास भेट देता येणार नाही. पेट्रोल पंपासंदर्भात निर्गमित करण्‍यात आलेले आदेशानुसार ता.१५ मेचे सकाळी सातवाजेपर्यंत कायम ठेवण्‍यात येत आले असून, महाराष्‍ट्र राज्‍य औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील पेट्रोल, डिझेल पंप सकाळी ८ ते ११ व सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत केवळ अत्‍यावश्‍यक सेवेकरिता सुरू ठेवण्‍याबाबत परवानगी देण्‍यात आली आहे. शेतीविषयक सेवा जसे कृषी सेवा केंद्र, दुकाने, बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके ई दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्‍याबाबत परवानगी देण्‍यात येत आली आहे.

संपादन - विवेक मेतकर

loading image