तेच चालवित असत टॅंकर अन् त्याच टॅंकरचे टायर काढून करीत असत चोरी

24_04_2019-24knj31-c-2_19165478_25924.jpg
24_04_2019-24knj31-c-2_19165478_25924.jpg
Updated on

अकोला ः ते दोघे आलटून पालटून टॅंकर चालवित असत. कंपनीतून निघालेला टॅंकर निश्‍चित स्थळी पोहचविण्याची जबाबदारी त्या दोघांचीच. मात्र, हे दोन टॅंकर चालक मध्येच रस्त्यात कोठेतरी थांबून त्याच टॅंकरचे टायरच नव्हे तर चक्क स्टेपनीसुद्धा काढून विकत असत. अशा या टायर चोरांना मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफिने अटक केली असून, त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त केला आहे. 

 याबाबत सविस्तर माहिती अशी की,1 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे दुपारी दीड वाजताच्या सुमारास टॅंकर क्रमांक एम.एच. 03 सीव्ही 3872 हे वाहन गुजरात राज्यातून हाजीरात ओएनसीजी कंपनीमधून गॅस टॅंकर भरून खापरी, नागपूर येथे गॅस प्लॅंटमध्ये जात असताना बाळापूर  तालुक्यातील रिधोरा येथे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ या टॅंकरचा चालक पवनकुमार तिवारी आणि नागेंद्रसिंह हे त्याच टॅंकरचे नामांकित कंपनीचे चार टायर प्रति किंमत 25 हजार 400 आणि स्टेपनी काढून असा एक लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. अशा फिर्यादीवरून बाळापूर पोलिस ठाण्यात 16 मे रोजी भादवि कलम 379, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखोकडे वर्ग करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिल निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी या आरोपीना शोधण्यासाठी पथक तयार करून आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलिस कॉन्स्टेबल रफिक शेख, अब्दुल माजिद, रवि इरचे यांनी केली. 

नागपुरातून घेतले आरोपीस ताब्यात
सदर गुन्ह्याच्या तपासात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी नागेंद्रसिंह यास नागपूर येथील बुट्टीबोरी एमआयडीसी परिसरात सापळा रचून शिताफिने ताब्यात घेतले आहे. या आरोपीस बाळापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील कारवाई बाळापूर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com