
अकोला : अकोला रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच चोरट्यांच्या जाळ्यात खा. संजय धोत्रे यांचे माजी खासगी सहाय्यकही अडकले असून, त्यांच्या खिशातील मोबाईल चोरीस गेला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी पोलिस असल्याचा बनाव करून मोबाईलचा लॉक कोड मिळवून तो फोन पूर्णपणे बंद केला आहे.