Balapur News : पदरी निराशा आल्याने एकाच महिन्यात तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले!

बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आल्याने एकाच महिन्यात तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
Three Farmers Die by endlife in a Month
Three Farmers Die by endlife in a Monthsakal
Updated on

बाळापूर - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आल्याने एकाच महिन्यात तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बाळापूर पोलिसांच्या हद्दीतील एक व उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.

सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून दधम येथील एक व शिंगोली येथील दोन शेतकरी फासावर लटकले. या तिन्ही शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सततची नापिकी, शेतमालाला नसलेला भाव व कर्जाचा वाढलेला डोंगर यामुळे राजेश नागोराव बोर्डे (वय ४८) यांनी आत्महत्या केली.

यांच्याकडे चार एकर शेती असून, अंदुरा येथील ग्रामीण बँकेचे कर्ज आहे. शिंगोली येथील दयाराम लक्ष्मण बोर्डे (वय-५५) यांनी गुडीपाडव्याच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. शेती पीकत नसल्याने ते चिंताग्रस्त होते.

‘त्या’ चिठ्ठीत दडलंय काय?

बाळापूर तालुक्यातील दधम येथील युवा शेतकरी कैलास जाधव याने दधम शेतशिवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी (ता. ३१) रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. मात्र, या शेतकऱ्याच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली आहे. कैलास जाधव यांच्याकडे पातूर तालुक्यातील पिंपळडोली येथे साडेतीन एकर शेतजमीन आहे.

मात्र, ती शेतजमीन सामाईक असून, या शेतीचा वाद सुरू आहे. व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कैलासचे वडील सहदेव जाधव यांनी सुद्धा यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कैलासच्या आत्महत्ये प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून संशयितांची चौकशी करण्याचे आश्वासन कुटुंबियांना दिले आहे.

बच्चू कडूंनी दिली भेट

प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिगोंली येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. शिंगोली येथील राजेश बोर्डे व दयाराम बोर्डे या शेतकऱ्यांनी डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर व सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. बुधवारी (ता. २) त्यांनी शिंगोली येथे जाऊन दोन्ही कुटुंबियांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com