

Accident
sakal
देऊळगाव राजा - धोत्रा नंदई व टाकरखेड भागिले परिसरात दोन दिवसांत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुचाकी रस्त्याच्या कडेला उतरल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दुसऱ्या घटनेत कारच्या धडकेत एक पादचारी मरण पावला. या दोन्ही घटना ता. १ व २ डिसेंबर रोजी घडल्या.