
Gram Panchayat Office
sakal
कारंजा : ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना स्वतःच्या स्वतंत्र व सुसज्ज कार्यालयीन इमारतीची सुविधा मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ता. १० ऑक्टोबर रोजी या संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून, कारंजा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत स्वतःचे कार्यालय बांधण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.