सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी अकोला परिमंडलात तीन हजार कर्मचारी

कोरोना संसर्गातही अखंडित सेवा; अत्यावश्यक सेवांना विशेष महत्त्व
Three thousand employees in Akola circle for smooth power supply
Three thousand employees in Akola circle for smooth power supplyFile Photo
Updated on

अकोला ः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालयासह सर्व अत्यावशक सेवा तसेच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अकोला परिमंडलातील महावितरणचे सुमारे तीन हजार अधिकारी ,अभियंते व कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. Three thousand employees in Akola circle for smooth power supply

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा रुद्रावतार बघता ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालये, कोविडचे विशेष कक्ष, विलगीकरन कक्ष याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अत्यावशक सेवांना अखंडित वीज पुरवठा मिळेल याची विशेष खबरदारी महावितरणकडून घेतली जात आहे. या शिवाय अत्यावशक सेवेसाठी तत्काळ नवीन वीज जोडणी देण्याची प्रक्रियाही महावितरणकडून राबविली जात आहे.

लॉकडाउनमध्ये नागरीकांना घरी बसणे सुरळीत वीज पुरवठ्यामुळेच शक्य होत आहे. त्यातच आता दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. सर्वच नागरिक घरी असल्याने टिव्हीसह विविध विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी विविध कारणाने वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेऊन तो पूर्ववत करत आहेत. कोरोनाच्या संकटातही महावितरणचे कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत आहेत.

१५७१ जनमित्र कार्यरत

अकोला परिमंडलांतर्गत अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात महावितरणचे ३०० अभियंते, १५७१ जनमित्र, २७९ यंत्रचालक, ३७१ बाह्यस्त्रोत कर्मचारी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत आहे.यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सहाय्यासाठी व्यवस्थापनातील ४५१ पेक्षा अधिक अतांत्रिक कर्मचारीही आपली सेवा बजावत आहे.

२४३ कर्मचाऱ्यांना संसर्ग, तिघांचा मृत्यू

कोरोनाचे संकट बघता महावितरणचे कर्तव्य बजावताना गेले वर्षभरात अकोला परिमंडळातील २४३ कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सध्यास्थितीत ५९ कर्मचारी हे कोरोना बाधित असून, तीन कर्मचाऱ्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com