

अकोला : दहा दिवस विघ्नहर्ता श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्यानंतर मंगळवारी (ता. १७) भाविक भक्त गणेशाला निरोप देतील. या विसर्जन उत्सवाची भव्यता लक्षात घेता गणेशोत्सवानिमित्त शहर व जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबत आदेश जारी केला.