पोलिसांच्या बदल्यांचा पोळा फुटला

भगवान वानखेडे 
Thursday, 23 July 2020

186 पोलिस काॅन्स्टेलबसह 338 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या 
ठाण मांडून बसलेल्या बसला झटका ः पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी काढले आदेश

अकोला ः प्रशासकीय आणि विनंतीवरून सन 2020-21 या आर्थिक वर्षात 31 मे पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या या 31 जुलै पर्यंत त्या-त्या संवर्गातील एकुण कार्यरत पदाच्या 15 टक्क्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 338 पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या बुधवारी (ता.22) करण्यात आल्या आहेत. तसे आदेश पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी बुधवारी निर्गमीत केले आहेत. यामध्ये 186 पोलिस पोलिस काॅन्स्टेबलचा समावेश आहे. 

जिल्ह्यात अखंडीत किंवा खंडीत स्वरुपाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविली होती. यात ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ पाच वर्ष झालेला आाहे, किंवा त्या कर्मचाऱ्याने बदलीसाठी विनंती केली असेल अशा पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. विशेष म्हणजे पोलिस दलातील सर्वच पोलिस स्टेशनसह जिल्हा नियंत्रण कक्ष, सुरक्षा शाखा, यातायात विभाग, पोलिस मुख्यालय, बीडीएस, महिला तक्रार निवारण कक्ष, सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा अशा सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचा बदल्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

कही खुशी कही गम
तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणाऱ्या तसेच सलग्नतेच्या नावाखाली मर्जीतील ठिकाणी कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा माहिती मागविली होती. या माहितीनुसार त्यांची विभागाबाहेर बदली केली होती. हा निर्णय ऐतिहासिक होता. मात्र, यंदा कोविडमुळे बदल्या होणार नाही. आपल्याला एकाच ठिकाणी ठाण मांडून बसता येणार असल्याचे मनसुबे असणाऱ्यांमध्ये या आदेशामुळे काहीसी नाराजी तर काहींना आनंद झाला आहे. 

अनेकजण त्याच उपविभागात
अनेकांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र, त्या बदल्या ते ज्या उपविभागात कार्यरत आहेत त्याच विभागातील पोलिस ठाण्यांत झाली आहे. अशांना याचा काहीही परिणाम झाला नसून, अशांसाठी या बदल्यांचा निर्णय निमित्तमात्र, ठरला आहे. 

अशा झाल्या बदल्या
पद                                                              संख्या
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक                      24
हेड काॅन्स्टेबल                                           63
पोलिस नाईक                                                64
पोलिस काॅन्स्टेबल                                    186
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers of 338 police personnel